EXAM ORIENTED NOTES & MCQ || 06-10 Octomber 2018 || Current Affairs

चालू-घडामोडी 

 EXAM ORIENTED NOTES & MCQ || 0610 Octomber 2018 || Current Affairs

 • जगाचा सर्वाधिक लांबीचा हवाई प्रवास सुरू झाला
 • सिंगापूर ते न्यूयॉर्क दरम्यान ही विमानसेवा 19 तासांमध्ये पूर्ण होणार आहे.
 • 16,700 किलोमीटर लांबीच्या हवाईप्रवासादरम्यान दोन वैमानिक, विशेष खाद्यपदार्थांसह प्रवाशांच्या मनोरंजनासाठी चित्रपट तसेच टीव्ही देखील उपलब्ध असणार
 • सिंगापूर एअरलाइन्स या प्रवासाकरता एअरबस ए350-900युएलआर विमानाचा वापर करणार आहे.
 • या विमानातून 161 जण प्रवास करू शकतील, ज्यात 67 जण बिझनेस क्लास तर 94 जण प्रीमियम इकॉनॉमीचे प्रवासी असतील.
 • चालक दलात दोन वैमानिक आणि 13 सदस्यीय केबिन पथकाचा समावेश आहे.
 • अतिरिक्त कर्मचाऱयांमुळे कामाची विभागणी होऊ शकेल आणि उड्डाणादरम्यान प्रत्येक वैमानिकाला 8 तासांचा कालावधी विश्रांतीसाठी मिळणार असल्याचे एअरलाइनने सांगितले.

 • नोबेल शांतता पुरस्काराचे यंदा कांगोतील डॉ. डेनिस मुकवेगे आणि इराकच्या यजिदी कार्यकर्त्या नादिया मुराद मानकरी
 • युद्धग्रस्त क्षेत्रांमध्ये होणाऱया लैंगिक शोषणाविरोधात हे दोघेही कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत.
 • या शोषणाला बळी पडलेल्यांना पुन्हा उभारी देण्याचेही कार्य करत आहेत.
 • नार्वे येथे नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रेईस अंडरसन यांनी या दोघांच्या नावाची घोषणा केली.
 • यंदा या पुरस्कारासाठी 216 व्यक्ती व 115 संघटनांची नोंद घेण्यात आली होती.
 • स्त्राrरोग तज्ञ असलेल्या 63 वर्षीय डॉ. मुकवेगे यांनी युद्धग्रस्त डेमोक्रेटीर रिपब्लिक ऑफ कांगोमधील महिलांबाबतची हिंसा आणि बलात्कार तसेच लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना मानसिक धक्क्यातून मुक्त करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहेत.
 • इराकच्या 25 वर्षीय नादिया मुराद यांनी लैंगिक शोषणाची भयावहता आणि अमानुषता अनुभवली आहे.
 • आयएसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये त्यांचे अपहरण करून तीन महिने सेक्सस्लेव्ह म्हणून अमानवी अत्याचार केले होते.
 • मात्र त्यांनी कशीतरी सुटका करून घेतली.
 • त्यानंतर त्यांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आघाडी सुरू केली.

 • हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी शपथ ग्रहण केली.
 • राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्य न्यायाधीशपदाची व गोपनीयतेची न्यायमूर्ती सुर्यकांत यांना शपथ दिली.
 • मुख्य न्यायाधीश पद न्यायमूर्ती मंसुर अहमद यांच्या निवृत्तीपासून म्हणजेच 24 एप्रिल 2017 पासून रिक्त होते.
 • मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केलेले न्यायमूर्ती सुर्यकांत हे हिमाचल प्रदेशचे 23 वे मुख्य न्यायाधीशपदावर विराजमान झाले

 • राज्यात हुक्का बंदी
 • राज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
 • त्यामुळेआता राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आली आहे.
 • कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
 • हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.
 • महाराष्ट्राआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे.

 • डॉ. मोहन आगाशे यांना  ‘भावे पुरस्कार जाहीर
 • यंदाचाआद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर
 • प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 • पंचवीस हजार रुपये गौरव पदक, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप
 • मराठी रंगभूमीवर प्रदिर्घ सेवा करणाऱ्या रंगकर्मीला हा पुरस्कार देण्यात येतो.
 • 1959 मध्ये पहिल्यांदा बालगंधर्व यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

 • सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग अखेर मोकळा
 • निर्बंध लादण्याची अमेरिकेने दिलेली धमकी आणि इतर अडथळे धुडकावून लावत भारत आणि रशियामध्ये पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
 • दोनी देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर सह्या झाल्या आहे.
 • भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली.
 • यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागले आहेत.
 • एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचे सामर्थ्य आहे.
 • एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम
 • शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम
 • रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप

 • युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक
 • 16 वषीय चौधरीने 244.2 गुण घेत अव्वल स्थान मिळविले.
 • दक्षिण कोरियाच्या सुंग युनहोने 236.7 गुण घेत रौप्य व स्वित्झर्लंडच्या सोलारी जेसनने 215.6 गुण घेत कांस्यपदक मिळविले.
 • अंतिम फेरीत आठ नेमबाजांचा सहभाग होता. चौधरीने या फेरीत 10 व त्याहून अधिक गुण 18 वेळा मिळविले.
 • पात्रता फेरीत त्याने 580 गुणांसह पहिले स्थान घेतले होते.
 • त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच कनि÷ आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदके मिळविली होती.
 • याच क्रीडा प्रकारात महिलांमध्ये मनू भाकरनेही सुवर्णपदक मिळविले आहे.

 • महाराष्ट्राचा सुनीत जाधव ‘आशिया-श्री’चा मानकरी
 • पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या52व्या आशियाई शरीरसौष्ठव क्रीडा
 • स्पर्धेतमहाराष्ट्राच्यासुनीत जाधवने ‘आशिया-श्री’ किताबावर नाव कोरले.
 • भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पाच सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदकांना गवसणी घातली.
 • पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात सुनीतने सुवर्णपदक मिळवले
 • भारताला दुसरे सुवर्णनितीन म्हात्रेने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात मिळवूनदिले.
 • चार वेळचा ‘भारत-श्री’ व एकदा ‘जागतिक-श्री’ विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या नितीनने 14 वर्षांच्या मेहनतीनंतर आशियातील विजेतेपदाला गवसणी घातली.
 • भास्करन (60 किलो), बॉबी सिंग (80 किलो), यतिंदर सिंग (85 किलो) यांनीदेखील सुवर्णपदकाची कमाई केली

 • आशियाई पॅरा स्पर्धेत भालाफेकपटू संदीप चौधरीने भारताला यंदाचे पहिले सुवर्ण
 • पुरुषांच्या एफ 42-44/61-64 गटात पुरुषांच्या इव्हेंटमध्ये त्याने अव्वलस्थान संपादन केले.
 • संदीपने आपल्या तिसऱया प्रयत्नात 60.1 मीटर्सची फेक नोंदवली
 • या इव्हेंटमध्ये श्रीलंकेच्या सम्पथ हेट्टीने 59.32 मीटर्स फेकीसह रौप्य
 • इराणच्या ओमिदी अलीने 58.97 मीटर्सच्या फेकीसह कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.

 • युवा नेमबाज मनू भाकेरला सुवर्णपदक
 • अर्जेंटीनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या
 • युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची युवा नेमबाजपटू
 • मनू भाकेरने सुवर्णपदक
 • यास्पर्धेतले नेमबाजी प्रकारातले भारताचे हे पहिले सुवर्णपदक
 • 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनूने 236.5 गुणांची कमाई करत आपले पहिले स्थान कायम
 • तसेच या स्पर्धेत रशियाच्या इयाना एनिनाने रौप्यपदक तर जॉर्जियाच्या निनो खुत्सिबेरित्झने कांस्यपदक मिळवले.

 • तिरंदाज हरविंदर सिंगने आशियाई पॅरा स्पर्धेत
 • पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह इव्हेंटमध्ये सुवर्णपदक
 • मोनू घन्गसने पुरुषांच्या थाळीफेकीत रौप्य जिंकले
 • मोहम्मद यासीरने पुरुषांच्या गोळाफेकीत कांस्यपदक प्राप्त केले.
 • हरविंदरने चीनच्या झाओ लिक्झूला अंतिम फेरीत 6-0 अशा एकतर्फी फरकाने मात देत
 • भारताची सुवर्णसंख्या सातवर नेली.

प्रश्न मंजुषा


 

 

 • जगाचा सर्वाधिक लांबीचा हवाई प्रवास कोठून कुठ पर्यन्त सुरू झाला
 • नोबेल शांतता पुरस्काराचे यंदा —–आणि – —- यांना घोषित
 • हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती —– यांनी शपथ ग्रहण केली.
 • हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे —— क्रमाकचे राज्य ठरले आहे
 • डॉ. मोहन आगाशे यांना  ‘——————— पुरस्कार जाहीर
 • महाराष्ट्राचा —— ‘आशिया-श्री’चा मानकरी ठरला

 

Please follow and like us:
0
Like
2

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi