Current Affairs || 24 -31 July 2018 ||चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ

Current Affairs || 24 -31 July 2018 ||चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ

current affairs

 • या शतकातील सर्वात मोठे आणि अधिक वेळ खग्रास स्थिती असलेले ‘खग्रास चंद्रग्रहण’
 • शुक्रवारी 27 जुलै
 • रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी चंदग्रहणाला सुरुवात
 • भारतासह पूर्ण जगभरात हे चंदग्रहण पाहायला मिळाले.
 • सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात,
 • त्यावेळी ग्रहण होते.
 • भारतात देखील हा ‘ब्लड मून’ पाहायला मिळाला आहे.

 • पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बांगला’करण्यास राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिली
 • पश्चिम बंगाव विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
 • इंग्रजीतील वर्णमालेनुसार पश्चिम बंगालच नाव सर्वात खाली येते.
 • वर्णमाला क्रमात राज्याचे नाव वर यावे यासाठी ममता बॅनर्जी सरकारने हा निर्णय घेतला
 • विधानसभेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतरही राज्याला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पहावी लागणार
 • गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यास,पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’होईल.
 • केंद्र सरकारने 2016 मध्ये पश्चिम बंगाल सरकारच्या तीन नावांचा प्रस्ताव फेटाळला होता.
 • राज्याचे बंगाली भाषेत ‘बांगला’, इंग्लिश भाषेत ‘बेंगाल आणि हिंदी भाषेत ‘बंगाल’ करण्यात यावे, असा प्रस्ताव पश्चिम बंगाल सराकारने दिला होता.
 • परंतु एकाच राज्याचे तीन वेगवेगळय़ा भाषेत, तीन वेगवेगळी नाव असू शकत नाहीत, असे सांगत केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळला होता.

 • महिनाभर नोकरीत नसलेल्या व्यक्तीला पीएफ काढता येणार :
 • किमान एक महिनाभर नोकरीत नसलेल्या व्यक्तीला भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) 75 टक्के रक्कम काढता येईल,
 • कामगार मंत्री संतोष गंगवारयांनी लोकसभेत सांगितले.
 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना परिच्छेद 68 एचएच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • सतत एक महिना कुठल्याही नोकरीत नसलेल्या व्यक्तीला त्याच्या नावावर असलेल्या निधीपैकी 75 टक्के पैसे काढता येतील.
 • जर एखादी व्यक्ती संबंधित संस्थेत दोन महिने नोकरीत नसेल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 नुसार तिला भविष्य निर्वाह निधीची सगळी रक्कम काढता येईल.
 • विवाहाच्या कारणास्तव राजीनामा देणाऱ्या महिलांना पैसे परत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आता राहणार नाही.

 • राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मागार्चा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला
 • उस्मानाबाद-सोलापूरच्या व विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची सोय होणार
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागार्बाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
 • प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्रीपीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे.
 • रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19 च्या योजनात नव्या रेल्वेमागार्चा समावेशकरण्यात आला आहे.
 • सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

 • लाच देणाऱ्या आणि घेणाऱ्यासाठीही शिक्षेची तरतूद असणारे तसेच भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे दोन वर्षांत निपटण्यासाठी आणण्यात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी संशोधन विधेयक 2018
 • 24 जुलै रोजी लोकसभेत मंजूर
 • हे विधेयक मांडताना कार्मिक, लोक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जे लोक आपले काम प्रामाणिकपणे करतात अशा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यामुळे सुरक्षा प्रदान होणार आहे.
 • जितेंद्र सिंह म्हणाले, भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये त्वरीत सुनावणीची तरतुद आहे.
 • या विधेयकात लाच घेणाऱ्यावर दंडासह तीन ते 7 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
 • भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच्या 1988च्या कायद्यात बदल करुन हे नवे विधेयक आणण्यात आले
 • यामध्ये 2013 मध्ये पहिल्यांदा बदलासाठी संसदेत मांडण्यात आले त्यानंतर ते संसदीय समितीसमोर चर्चेसाठी ठेवण्यात आले.
 • पुढे ते विधी तज्ज्ञांच्या समितीकडे आणि 2015 निवड समितीकडे पाठवण्यात आले.
 • या समितीने 2016 मध्ये आपला अहवाल सरकारकडे पाठवून दिला.
 • त्यानंतर 2017 मध्ये हे विधेयक संसदेत मांडण्यात आले.

 • गडचिरोलीतील पोलीस मुख्यालय गिनेस बुकात :
 • ‘गांधी विचार व अहिंसा‘ या पुस्तकाद्वारे शांततेचा संदेश देणाऱ्या
 • गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले .

एखाद्या पोलीस मुख्यालयाचे नाव अशा पद्धतीने गिनेस बुकात नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे


 • मंगळावर आढळले पाण्याचे भूमिगत तलाव :
 • मंगळावर शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच पाण्याचे भूमिगत तलाव आढळले
 • या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली
 • मार्टियन बर्फाच्या स्तराखाली असलेले हे तळे तब्बल 20 किमी रुंद
 • इटालियन संशोधकांच्या अहवालात नमूद करण्यात आले
 • 3.6 अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

 • दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर :
 • रियल लाईफमधले फुंगसुक वांगडु म्हणजेच सोनम वांगचुक यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
 • आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील फुंगसुक वांगडु हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत.
 • लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत.
 • सोनम वांगचुक यांच्या बरोबरीने डॉ़क्टर भारत वाटवानी यांची सुद्धा रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 • सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला
 • मॅगसेस पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.

 • दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र
 • मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
 • ब्रिक्स संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाली असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे

 • भारतीय महिला तिरंदाजांनी सांघिक प्रकारामध्ये जागतिक क्रमवारीत पहिले स्थान
 • बर्लिन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत मोठी उडी घेतली
 • 342.60 गुणांसह सध्या भारतीय महिला अव्वल स्थानावर
 • दुसऱ्या स्थानावर  चीन तैपेईच्या खात्यात 336.60 गुण

 • इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी दर कमी :
 • ग्राहकांना इलेक्ट्रीक वस्तू सात ते नऊ टक्के कमी दराने विकत घेता येणार
 • केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुलै रोजी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या
 • 28व्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आला.
 • जीएसटी कररचनेत इलेक्ट्रॉनिक उत्पादने 28 टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यात आली
 • आता काही इलेक्ट्रॉनिक उत्पादने 18 टक्क्यांच्या कक्षेत आली
 • टीव्ही, फ्रिज, व्हॅक्युम क्लिनर्स, वॉशिंग मशिन या दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्यात

 • प्लास्टिक, थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध :
 • प्लास्टिक आणि थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांची पैदास पुण्यातील संशोधकाने केली.
 • पुढील काळात प्लास्टिक विघटनाची चिंता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता.
 • मेणअळी किंवा अगदी घराच्या धान्यात होणाऱ्या पाखरांच्या अळ्याही प्लास्टिक खातात.
 • डॉ. राहुल मराठे यांनी या अळ्यांची जवळपास बारावी पिढी प्लास्टिकच्या खुराकावर जोपासली
 • ह्या अळ्या प्लास्टिकमधील पॉलिमर हा घटक खाऊन पचवतात.
 • प्लास्टिकच्या एका पिशवीचे विघटन होण्यासाठी 10 वर्षे लागतात
 • तिथे साधारण 50 अळ्या एक पिशवी चार दिवसांत नष्ट करतात.
 • अळ्यांची विष्ठा ही खत म्हणून वापरता येते.

 • मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठीही आता कागदविरहीत तिकीट :
 • मध्य व पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांसाठी कागदविरहीत (पेपरलेस) तिकीट सुविधा उपलब्ध केल्यानंतर
 • आता मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या प्रवाशांसाठीदेखील ही सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार.
 • रेल्वेच्याक्रिस संस्थेकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) चाचणी सुरू आहे.
 • तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’ने मोबाईल तिकिटाची संकल्पना आणली.
 • 2015मध्ये प्रथम कागदविरहीत (पेपरलेस) तिकीट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली

 • मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन :
 • मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच,
 • आरक्षणाच्या कायद्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार
 • आरक्षणासाठीच्या आंदोलनात हिंसाचार न करणा-या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 • मराठा समाजासाठीची पदे रिकामी ठेवूनच राज्य सरकार मेगा भरतीकरणार आहे.

 • पुणे पोलिस आयुक्तपदी के. व्यंकटेशम यांची निवड :
 • पुण्याच्या आयुक्तपदी के. व्यंकटेशम यांची नियुक्ती
 • रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी
 • ठाण्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांच्या जागी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली.
 • नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नेमणूक केली.
 • परमवीर सिंग यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदाची जबाबदारी
 • अतिरिक्त महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त.

 • भारत संरक्षणसामग्री उत्पादनाचे केंद्र होणार :
 • येत्या दशकात भारताला संरक्षणसामग्री उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्याची केंद्र सरकारची योजना
 • संरक्षण उत्पादन धोरण 2018 पुढील महिन्यात अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
 • भारत सध्या जगातील मोठा संरक्षणसामग्री आयातदार देश
 • पाच वर्षांत भारताची संरक्षणसामग्रीची आयात 111 टक्क्यांनी वाढली
 • अत्याधुनिक आणि संवेदनशील शस्त्रास्त्रे देशात संशोधन करून उत्पादन करण्यावर भर देण्यात येईल.
 • त्यात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, बंदुका, युद्धनौका, रणगाडे आदींचा समावेश असेल.

 • आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशाला सुवर्णपदक :
 • बजरंग पुनियाने सलग दुस-याआंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
 • राष्ट्रकुल विजेत्या बजरंगने महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
 • 29 जुलै रोजी 70 किलो गटाचे सुवर्ण जिंकले
 • संदीप तोमरनेही रौप्यपदक जिंकले
 • इस्तानबुल येथे झालेल्या यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीयांनी एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली
 • पिंकीही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडूआहे.
 • 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला.

MCQ CURRENT AFFAIRS JULY 2018

 

 • या शतकातील सर्वात मोठे आणि अधिक वेळ असलेले ‘——चंद्रग्रहण
 • पश्चिम बंगालचे नाव बदलून —–करण्यास राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिली
 • ——-या पुस्तकाद्वारे शांततेचा संदेश देणाऱ्या गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नाव गिनेस बुक
 • ——- ने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

CURRENT AFFAIRS VIDEO

Please follow and like us:
0
Like
4

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi