Current Affairs || 01-05 October 2018 || Chalu Ghadamodi

Current Affairs || 01-05 October 2018 ||

current affairs

 

 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता गोपीनाथ यांची निवड
 • भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथयांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी 
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डीयांनी गीता यांची निवड केली आहे.
 • सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत.
 • मोरी डिसेंबरमध्ये निवृत्त होतील झाल्यानंतर गीता गोपीनाथ कार्यभार सांभाळणार
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
 • तसेच याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
 • राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.

 • बीसीसीआय आता माहिती अधिकारांतर्गत
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता यापुढे माहितीच्या अधिकार अंतर्गत (आरटीआय)
 • माहितीच्या अधिकाराच्या नियमांनुसार बीसीसीआय देशातील जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बाधिल असेल, असा ऐतिहासिक आदेश केंद्रीय सूचना आयोगाने (सीआयसी) दिला.
 • आरटीआय प्रकरणातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘सीआयसी’ने हा आदेश देण्यासाठी कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, भारतीय विधी आयोगाचा अहवाल तसेच युवा आणि क्रीडा विषयी मंत्रालयाच्या केंद्रीय लोक सूचना अधिकारीचे प्रस्ताव अशा गोष्टींचा अभ्यास केला.
 • यानुसार बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत आरटीआय प्रावधानचे कलम दोन (एच) आवश्यक नियम पूर्ण करतात, असे निदर्शनास आले आणि सीआयसीने हा आदेश दिला.

 • कर्करोगावरील उपचारपद्धतीला नोबेल
 • कर्करोगावरील उपचारासाठी नवी क्रांतिकारी उपचारपद्धती विकसित करणारे अमेरिकेचे जेम्स ऍलिसन आणि जपानचे तासुकू होंजो यांना या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला
 • रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते.
 • प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत जातो.
 • कर्करोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रोग्याला मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करण्यात येत होते.
 • ऍलिसन आणि होंजो यांनी नवी उपचार पद्धती शोधून काढली.
 • या नव्या पद्धतीमुळे रोग्याची कर्करोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल आणि शरीरातील पेशी या कर्करोगापासून सुरक्षित राहू शकतील.
 • या नव्या पद्धतीमुळे रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतील. या कामगिरीबद्दल ऍलिसन आणि होंजो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर:

 • जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कार जाहीर झालेआहेत. यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागली असून डोना स्ट्रीक्लंड असे त्यांचे नाव आहे.
 • हापुरस्कार भौतिकशास्त्रासाठी दिला असून 3 जणांना तो देण्यात येणारआहे.
 • आर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात येणारआहे.
 • डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात येणारआहे.
 • हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
 • यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे.
 • 70 वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

 • इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष बरहम सालेह:
 • इराकच्या राष्ट्राध्यक्षपदीबरहम सालेह हे विजयी झाले
 • 2 ऑक्टोबर रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
 • पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला.
 • 58वर्षीय बरहम सालेह यांना 219 तर फुआद यांना 22 मते मिळाली.
 • बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.

 • सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई:
 • ज्येष्ठ न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीशम्हणून शपथ घेतली.
 • राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनणारे ते पूर्वेकडील राज्यातील पहिले न्यायाधीशआहेत.
 • उच्च न्यायालयातील 21 वर्षाच्या सेवेनंतर माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रानिवृत्त झाले
 • त्यातील 14 वर्ष त्यांनी देशातील विविध कोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
 • नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते.
 • 23 एप्रिल 2012 रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून शपथ घेतली

 • रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर
 • उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीरकरण्यात आला
 • या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारांमध्येही करता येणे शक्‍य आहे.
 • फ्रान्सेस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर या तिघांना या वर्षीचे रसायनशास्त्राचे नोबेल रॉयल स्वीडीश ऍकॅडमीने जाहीरकेले.
 • डार्विन यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांताचा वापर प्रत्यक्ष परीक्षानळीत करून नवी प्रथिने तयार करण्याचे काम या तिघा शास्त्रज्ञांनी केले, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
 • या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या पद्धतीमुळे नवी एन्झाईम आणि नवी प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार करणे शक्‍यझाले.
 • त्यामुळे पर्यावरणस्नेही रसायन उद्योगाकडे वाटचाल करणे शक्‍य होईल;
 • तसेच विविध आजारांवर उपचार करून मानवी जीवन अधिक समृद्ध करता येऊ शकेल, असे पुरस्कार समितीने म्हटले

 


 • राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौर्‍यावर
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वार्षिक व्दिपक्षीय शिखर बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 4 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर
 • यादौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान एस-400 हवाई सुरक्षा प्रणालीसह अवकाश आणि ऊर्जा सारख्या महत्वाच्या क्षेत्रात अनेक करारांवर हस्ताक्षर होणार .
 • 19 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनात दोन्ही नेत्यांमध्ये विविध व्दिपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर व्यापक चर्चा होईल.
 • मॉस्कोच्या विरोधात अमेरिकन निर्बंध आणि दहशतवाद विरोधी सहकार्याचाही समावेश
 • रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पण आले आहे.
 • यामध्ये उपपंतप्रधान युरी बोरिसोव, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि उद्योग मंत्री डेनिस मंतुरोव्ह यांचा समावेश आहे.

 • देशाचे नवे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आरएन रवी
 • संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष आर.एन. रवी यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती
 • अजित डोवाल यांच्या टीममध्ये आता 3 उपराष्ट्रीय सल्लागार झाले
 • केरळ केडरच्या 1976 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी
 • उग्रवादी संघटना नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-आयएम) बरोबर सुरु असलेल्या चर्चेत सरकारचे प्रतिनिधीही
 • गुप्तचर पथकाचे माजी प्रमुख अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
 • डोवाल यांच्या टीममध्ये उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची संख्या वाढून ती 3 इतकी झाली आहे.
 • रवी यांच्याशिवाय राजिंदर खन्ना आणि पंकज सरण हे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

 


 • सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी
 • फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले असून, चालू वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्येही ते अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 43.5 अब्ज डॉलर असून, चालू वर्षात त्यामध्ये 9.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे.
 • अंबानी यांच्यापाठोपाठ ‘विप्रो’चे चेअरमन अझिम प्रेमजी यांनीही आपले दुसरे स्थान कायम राखले असून, त्यांची एकूण संपत्ती 21 अब्ज डॉलर इतकी आहे.
 • ‘अर्सेलर मित्तल’चे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल हे या यादीत तिसऱ्या स्थानी असून, त्यांची एकूण संपत्ती 18.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
 • हिंदूजा ब्रदर्स आणि पालनजी मिस्त्री हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
 • त्यांची एकूण संपत्ती अनुक्रमे 18 व 15.7 अब्ज इतकी असल्याची माहिती फोर्ब्सने दिली.

 • संदीप बक्षी आयसीआयसीआय बॅंकचे नवे सीईओ होणार
 • खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांना बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केले जात आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
 • चंदा कोचर यांनी बँकेतून लवकर निवृत्ती घेतली असून, बॅंकेनेही त्यांची निवृत्ती स्विकारली आहे.
 • चंदा कोचर यांच्या विरोधात व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी चौकशी सुरू आहे.
 • त्यामुळे कोचर सध्या सक्तीच्या रजेवर होत्या.
 • चंदा कोचर यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार आहे, अशी माहिती बॅंकेने दिली.

 


 • अभिजित कटकेला सुवर्ण
 • हरयाणाच्या मल्लांनी टाटा मोटर्स राष्ट्रीय कुस्ती स्पध्रेवर वर्चस्व गाजवले
 • अभिजित कटकेच्या सुवर्णपदकासह आणखी तीन रौप्यपदके कमावत महाराष्ट्राने छाप पाडली.
 • महाराष्ट्राने एकूण 139 गुणांसह तिसरे स्थानसंपादन केले.
 • 125 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अभिजितने सेनादलाच्या संजयचा 7-2 असा पाडाव करून सुवर्णपदक पटकावले.

 • दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक
 • भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने  तिरंदाजी विश्वचषक कांस्य पदकाची कमाई केली.
 • दीपिका हिने विश्वकप फायनल्समध्ये पाचव्यांदा पदक मिळवले आहे.
 • या आधी ती चार वेळा रौप्यपदक विजेती राहिली

प्रश्न मंजुषा

प्रश्न मंजुषा

 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी ——-यांची निवड
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता यापुढे ——अंतर्गत
 • भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला
 • रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वार्षिक व्दिपक्षीय शिखर बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष —–दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर
 • भारतीय तिरंदाज —-हिने  तिरंदाजी विश्वचषक कांस्य पदकाची कमाई केली
Please follow and like us:
0
Like
1

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi