23-30 September 2018 || Current Affairs

2330 September 2018 || Current Affairs In Marathi

current affairs

 

 • बालमजुरीला रोखण्यात भारताला यश
 • जगभरातील चौदा बड्या देशांनी बालमजुरीच्या समस्येचे बऱ्याच अंशी निराकरण केले असून, यामध्ये भारताचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 • मागील वर्षी भारताने ही समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना आखल्या आहेत, असे अमेरिकेच्या कामगार विभागाने ‘बालकामगार आणि वेठबिगारांसंबंधी‘ तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 • यंदा या अहवालाची निर्मिती करण्यासाठी अधिक कठोर निकषांचा आधार घेण्यात आला होता, यासाठी जगभरातील तब्बल 132 देश आणि प्रदेशांतील बालमजुरीच्या समस्येचा नेमका आढावा घेण्यात आला होता.
 • यान्वयेकेवळ चौदा देशांना नव्याने निर्धारित कठोर निकष पूर्ण करण्यात यश आले असून, यामध्ये कोलंबिया, पॅराग्वे आणि भारताचादेखील समावेश आहे.

 • दशभरातील पशुगणना करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून सरुवात करण्यात येणार असून यात वेगवेगळय़ा प्रकारे गणना केली जाणार आहे
 • यांचा फायदा कृषीक्षेत्रासह दुग्ध व्यवसायालाही चालना देण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.
 • भारतात सध्या होणारी पशुगणना ही 20 वी असून या गणनेत मोबाईल फोन संगणक आणि टॅबलेट गॅजेटचा वापर करुन आकडेवारी गोळा करण्यात येणार.
 • यामुळे गतीमान पद्धतीने गणना पुर्ण करण्यात येऊन यासाठी केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून संपूर्ण यंत्रणा राबण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
  मागील पशुगणना सन 2012 मध्ये करण्यात आली होती.
 • यंदा होणाऱया गणनेत गाय, म्हैस, घोडा, कुत्रा, कोंबडी, कोंबडा अशी वर्गवारी करण्यात येणार असून त्याचे नोंदणी वेगळी केली जाणार आहे.
 • याला पुर्व तयारीत गाव, शहर , वॉर्ड अशा ठिकाणात विभागणी करुनच ही गणना करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे.

 • सिक्कीमच्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे लोकार्पणकरण्यात आले.
 • यावेळी, मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते.
 • सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी गंगटोकमध्ये दाखल झाले होते.
 • सिक्कीममधील या विमानतळाचे काम 2009 मध्ये सुरू करण्यात आले होते.
 • विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यास जवळपास 9 वर्षाचा कालावधी लागला आहे.
 • हे सिक्कीममधील पहिले विमानतळ असून सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून हे जवळपास 33 कि.मी. अंतरावर आहे.
 • तसेच हे विमानतळ 201 एकरवर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आले आहे.
 • सिक्कीममधील या पहिल्याच विमानतळामुळे सिक्कीम आता हवाई वाहतुकीच्या नकाशावरही दिसणार आहे.

 • रमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार
 • वर्षभर सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून संपूर्ण देशाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या मुंबई आणि पुण्याच्या खेळाडूंना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले आहे.
 • यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे व नेमबाज तेजस्विनी सावंत, 19 वर्षांखालील विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि कबड्डीतील महाराष्ट्राचा उगवता तारा रिशांक देवाडिगा यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) पुरस्कारांनी गौरवण्यात येणारआहे.
 • तर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षकरमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानितकरण्यात येणार
 • एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या पुण्याच्या राहुलची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडू’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे,
 • तर पुण्याच्याच तेजस्विनी आणि मुंबईच्या हीना सिधू या दोघींची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट महिला’ खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • तेजस्विनी आणि हीना दोघींनीही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, तर हीनाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली होती.

 • रयत शिक्षण संस्थेसाठी विशेष टपाल तिकीट
 • रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे.
 • सातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात 4 ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली.
 • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.
 • संस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.

 • आधारविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
 • शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी ‘आधार कार्ड‘ असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी दिला.
 • ‘आधार‘च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली.
 • तसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.
 • यामुळे ‘आधार’चा डेटा खासगी कंपन्यांना वापरता येणार नाही.
 • ‘आधार‘मुळे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या आशयाच्या 31 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला.
 • या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अर्जनकुमार सिक्री, न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर, न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे.
 • गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी आणि इतर कारणांसाठी ‘आधार’ सक्ती केली होती.
 • त्यातील काही गोष्टींसाठीची सक्ती रद्द केली असली, तरीही ‘आधार’ घटनात्मकरित्या वैध असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 • बलात्काराच्या खटल्यात पीडितेने ऐनवेळी आरोपीला वाचवण्यासाठी आपली साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला तर पीडितेविरोधातच खटला चालवला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
 • एका प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत बलात्कारच झाला नसल्याचे सांगत कोर्टात साक्ष बदलली होती.
 • या घटनेचा संदर्भ घेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
 • ‘बलात्कार पीडितेकडून वैद्यकीय अहवालाव्यक्तिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव क्लीन चीट देण्याचा किंवा साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला गेला तर पीडितेविरोधातच खटला दाखल केला जाऊ शकतो’, असे गोगोईंच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

 • केरळच्या सबरीमाला मंदिरता महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी आता उठवण्यात आली
 • आज सुप्रीम कोर्टात 5 न्यायमूर्तींच्या पीठाने आपला ऐतिहासिक निकाल दिला.
 • 5 न्यायाधीशांच्या पीठाने 4-1 (बाजूने-विरोधात) या हिशेबाने महिलांच्या बाजूने निकाल ऐकवला.
 • CJI दीपक मिश्रा, जस्टिस चंद्रचूड, जस्टिस नरिमन, जस्टिस खानविलकर यांनी महिलांच्या बाजूने एकमताने निकाल दिला.
 • तर जस्टिस इंदू मल्होत्रा यांनी सबरीमाला मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. निकालाचे वाचन करताना चीफ जस्टिस दीपक मिश्रा म्हणाले की, आस्थेच्या नावावर लिंगभेद केला जाऊ शकत नाही.
 • कायदा आणि समाजातील सर्वांना बरोबरीने पाहिले जावे. महिलांसाठी दुहेरी मापदंड त्यांची प्रतिष्ठा कमी करतात.

 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मानाचा ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 • 2022 पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा धोरणात्मक संकल्प त्यांनी केला आहे.
 • ‘पॉलिसी लीडरशीप’ श्रेणीतून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनाही हाच पुरस्कार देण्यात आला आहे.

 • स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
 • पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणे महत्त्वाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
 • भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 हा महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हे कलम रद्द केले आहे.
 • व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे 158 वर्षे जुने कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला.
 • स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील व्यभिचार कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम 497बाबत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत साखर उद्योग, रेल्वे, हॉटेलिंगसह अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले
 • अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची विस्तृत माहिती दिली.
 • देशातील अतिरिक्तत साखर उत्पादन पाहता मंत्रिमंडळाने पॅकेजला मंजुरी दिली आहे.
 • दूरसंचार क्षेत्रातील नव्या क्रांतीला जन्म देणाऱया नव्या धोरणाला सरकारने मंजुरी दिल्याने संबंधित क्षेत्राच्या अडचणी दूर होऊ शकतात.
 • पाटणा विमानतळावर नवे डोमेस्टिक टर्मिनल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी 1216.90 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
 • काही हॉटेल्सच्या उभारणीचे काम रखडले होते.
 • पाटणा येथील पाटलिपुत्र अशोक हॉटेल आणि गुलमर्गचे अपूर्ण राहिलेले हॉटेल आता राज्य सरकारांना सोपविले जाणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.
 • छत्तीसगढ येथे कथगौरा ते दोनगढपर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 • राज्य सरकार आणि  रेल्वेदरम्यानचा हा पहिलाच संयुक्त प्रकल्प असणार आहे.
 • 294 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाकरता 5950 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

 • आयात फ्रिज, एसी सह 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
 • त्यामुळे येत्या काही दिवसात या वस्तू महाग होणार आहेत.
 • कच्च्या तेलाचे दर वाढल्याने वाढलेल्या व्यापारी तुटीवर एक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • घरगुती फ्रिज, वातानुकुलीत यंत्रे (एसी), वॉशिंग मशिन आदी वस्तूंवरील आयात करात 10 टक्के वाढ करण्यात आली असून तो आता 20 टक्के करण्यात आला आहे.
 • तसेच काँपेसर्स, स्पीकर्स आणि पादत्राणांवरील आयात कर अनुक्रमे 10 टक्के, 15 टक्के आणि 25 टक्के करण्यात आला आहे.
 • रेडियल कार टायर्सवरील करात 10 वरून 15 टक्क्यांपर्यंत, तर पैलू पाडलेले आणि प्रक्रियाकृते हिरे, कृत्रिम हिरे आणि अर्धप्रकियाकृत हिरे तसेच रंगीत मौल्यवान खडे यांच्यावरील आयात शुल्कही अडीच टक्क्यांनी वाढवून 7.5 टक्के करण्यात आले आहे.

 • भारताकडून ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीत
 • रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे.
 • परंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे.
 • फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले आहे की ‘व्हिलेज रॉकस्टार‘ चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करेल.
 • एकूण 12 सदस्यांच्या ज्यूरींनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
 • ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.
 • हा चित्रपट 28 सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे.
 • तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

 • भारत सातव्यांदा आशिया कप चॅम्पियन
 • अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात केदार जाधवने बांगलादेशविरुद्ध विजयी धाव घेत भारताच्या सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
 • अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले.
 • मात्र, भारतीयांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जेतेपद निसटू दिले नाही.
 • तसेच गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक पटकावला.
 • बांगलादेशनेप्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकात 222 धावा केल्यानंतर भारताने 50 षटकात 7 बाद 223 धावा करुन रोमांचक विजय मिळवला.

 • भारतीय महिला डॉक्टरला मास्टर्स अ‍ॅथलेटिक्समध्ये सात पदके
 • मलेशियातील बांदराया पुलाऊ पिनाग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स 2018 स्पर्धेमध्येमुंबईच्या डॉ. सविता पांढरे यांनी अ‍ॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये तब्बल सात पदके पटकावली.
 • तसेच त्यात 1500 मीटर, 4 बाय 400 मीटर रिले, 5000 मीटर चालणे या प्रकारांमध्ये रौप्य तर 800 मीटर धावणे आणि 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.
 • त्यांच्या या कामगिरीने अन्य ज्येष्ठवयीन खेळाडूंनादेखील प्रेरणा मिळाली.

 • ‘फिफा’कडून सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर
 • FIFA World Cup 2018 मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले होते.
 • त्यांनीक्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला.
 • या स्पर्धेसाठी फ्रान्सचे प्रशिक्षक असलेल्या दिदिएर देशॉयांना FIFAचा यंदाचा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • फ्रान्सने अंतिम सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले.
 • या विजेतेपदामुळे त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला.
 • संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले होते.

प्रश्न मंजुषा >>>

 

 • दशभरातील पशुगणना करण्यासाठी ———पासून सरुवात करण्यात येणार
 • ———— च्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
 • ———– यांना जीवनगौरव पुरस्कार
 • केरळच्या ——— मंदिरता महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी आता उठवण्यात आली
 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मानाचा ———-हा पुरस्कार देऊन सन्मानित
 • कलम ——– रद्द केले
 • भारताकडून ———–ऑस्करच्या शर्यतीत
Please follow and like us:
0
Like
1

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi