16-22 September 2018 || Current Affairs ||

चालू-घडामोडी –EXAM ORIENTED NOTES & MCQ

http://estudycircles.com/

current affairs

 • आयुष्मान भारत 23 सप्टेंबर पासून
 • देशातील 10 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण देऊ करणाऱया महत्वाकांक्षी आयुषमान भारत विमा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रांची येथे केला आहे.
 • ही जगातील सर्वात मोठी सरकारी विमा योजना मानली जात आहे. या योजनेत लहान मोठय़ा 1 हजार 300 आरोग्य समस्यांचा समावेश करण्यात आला असल्याने ती सर्वंकष असल्याचे म्हटले जात आहे.
 • या योजनेची माहिती मोदींनी स्पष्ट केली.
 • कोणालाही खरे तर रूग्णालयात जाण्याची आवश्यकताच भासू नये.
 • तथापि, तशी ती भासलीच तर ‘आयुषमान’ योजना त्याच्या साहाय्यार्थ धावून येईल.
 • ही योजना देशातील 10 कोटी कुटुंबांमधील 50 कोटी गरीब लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण देणार आहे.

 • संयुक्त राष्ट्र महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस पुढील महिन्याच्या प्रारंभी भारताचा दौरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्र महासचिव या नात्याने त्यांचा हा पहिला भारत दौरा असेल.
 • त्यांचा दौरा महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी होणार असल्याची माहिती त्यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी दिली.
 • 1 ऑक्टोबर रोजी गुतेरेस औपचारिक स्वरुपात नवी दिल्ली येथील नव्या संयुक्त राष्ट्र भवनाचे अनावरण करणार आहेत.
 • दोन ऑक्टोबर रोजी गुतेरेस हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाच्या समारोप सत्रात भाग घेतील. या दौऱयादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांची गुतेरेस हे भेट घेणार आहेत.
 • ‘जागतिक आव्हान, जागतिक तोडगा’ विषयावर इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये व्याख्यान देण्यापूर्वी गुतेरेस हे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याशी चर्चा करणार आहेत.
 • यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या महाअधिवेशनाच्या बैठकीत ते सहभागी होतील.
 • 3 ऑक्टोबर रोजी दुपारी ते अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट देणार आहेत.
 • महासचिव म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी भारताचा दौरा केला होता.
 • त्या दौऱयावेळी त्यांनी स्वराज यांची भेट घेतली होती.

 • ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ चिपळूणकर यांचे निधन:-
 • ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ वि.वि. चिपळूणकर निधन झाले.
 • राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झालेल्या चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्षे काम केले.
 • विद्याधर विष्णू उर्फ वि.वि. चिपळूणकर यांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी मुंबईत झाला.
 • 1948 मध्ये शिक्षकी पेशा पत्कारलेले चिपळूणकर 1987 मध्ये राज्याच्या शिक्षण संचालकपदावरून निवृत्त झाले.
 • शिक्षण संचालकपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.
 • ‘चिपळूणकर समिती‘च्या अहवालामुळे सर्वपरिचित झालेल्या चिपळूणकरांनी ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली.
 • ‘उद्धरावा स्वये आत्मा‘ हे विद्यानिकेतनचे ब्रीदवाक्‍य त्यांनीच सुचवले होते.
 • माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, बालभारतीचे संचालक, शिक्षण संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

 • सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.
 • पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून नवीन जम्बो बॅंक अस्तित्वात येणार आहे.
 • गेल्या दोन वर्षांत भरमसाट बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक बॅंकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे.
 • बहुतांश बॅंका तोट्यात असून सरकारवर भांडवल मदतीचा दबाव वाढत आहे.
 • गेल्या वर्षी सरकारने भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले
 • यामुळे स्टेट बॅंकेचा जगातील 50 बड्या बॅंकांमध्ये समावेश झाला.
 • नुकतेच बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक या तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले.
 • डिसेंबर अखेर पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स आणि आंध्र बॅंकेचे विलीनीकरण करण्यासंदर्भात या बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

 • 29 सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस
 • विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना 29 सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत.
 • युजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र पाठवले असून यात सर्व विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सना 29 सप्टेंबर रोजी विशेष परेड घेण्यास सांगण्यात आले आहे.
 • परेडनंतर एनसीसीचे कमांडर सीमेच्या संरक्षणासंबंधी या कॅडेट्सना संबोधित करतील.
 • 29 सप्टेंबर 2016 रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होते.
 • विशेष दलाच्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले होते.

 • रशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध
 • भारतरशियाकडून 450 कोटी डॉलर्स खर्चून ‘एस-400‘ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.
 • पण रशियन व्देषामुळे ही क्षेपणास्त्र खरेदी अमेरिकेला खुपत आहे.
 • त्यामुळे त्यांनी भारतावर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे.
 • भारत-रशिया संरक्षण संबंधांतर्गत भारत ही खरेदी करीत आहे. अशीच खरेदी चीननेही केली होती.
 • पण त्यानंतर अमेरिकेने चीनवर आर्थिक निर्बंध आणले.
 • चिनी मालाच्या आयातीवर अमेरिकेने भरमसाट शुल्क लावले. त्याचा चिनी बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला.
 • असेच निर्बंध आता अमेरिका भारतावर आणू पाहत आहे.

 • जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन ट्रॅकवर
 • एका मर्यादेबाहेर होणारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाला कारणीभूत आहे.
 • वाहतुकीच्या साधनांमुळे कार्बन उत्सर्जनातून मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होते.
 • बस आणि गाडयांच्या तुलनेत ट्रेनमुळे कमी प्रदूषण होत असले तरी ट्रेनमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच आहे.
 • या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.
 • हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे.
 • या ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही.
 • या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे.
 • अलस्टोममध्ये या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन 1 हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.
 • डिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंधनाची रचना आहे.
 • ट्रेनची अतिरिक्त ऊर्जा लिथियम आयन बॅटरीमध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे.
 • प्रवाशांसाठी जगातील या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा जर्मनीमध्ये सुरु झाली आहे.

 • आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर
 • महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.
 • दोन दिवसांपूर्वी दोघांची या पुरस्कारांसाठी शिफारस झाली होती.
 • दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे 25 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे वितरण होईल.
 • दरम्यान चौगुले यांनी न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले.
 • त्यानंतर 1970 व 1971 मध्ये महाराष्ट्र केसरी, 1973 मध्ये रुस्तम-ए-हिंद व महान भारत केसरीची गदा मिळविली.
 • त्यांनी 1976 मध्ये राष्ट्रीय, तर 1978 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
 • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर अर्जुन पुरस्कारासाठी राहीची शिफारस झाली होती. तिने यापूर्वी 2008 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2010 मधील राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण व रौप्य, तर 2014 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.
 • 2013 मध्ये दक्षिण कोरियातील विश्‍वचषक नेमबाजीत सुवर्ण, तर 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली आहे

 • विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर
 • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीरझाला आहे.
 • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.
 • कर्णधार कोहली याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळाला होता.
 • विराट कोहलीने या मालिकेत सर्वाधिक 593 धावा केल्या.
 • तर मीराबाई चानू हिचीही प्रगती वाखाणण्याजोगी झाली आहे.
 • मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
 • 48 किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
 • तसेच याशिवाय, 2017 मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती.
 • तिने 48 किलो वजनी गटात 194 किलो (स्नॅचमध्ये 85 आणि क्लीन-जर्कमध्ये 109 किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.
 • अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती.

22 वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.


 • भारताच्या सजन भनवालला रौप्यपदक
 • स्लोवाकियात सुरु असलेल्या World Junior Wrestling स्पर्धेत भारताच्या सजन भनवालने रौप्यपदकाची कमाई केली
 • 77 किलो ग्रेको रोमन प्रकारात रशियाच्या इस्लाम ओपिव्हने सजनवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली.
 • या स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदकासह सजन Junior Wrestling मध्ये लागोपाठ पदक मिळवणारा पहिला भारतीय पैलवान ठरला आहे.
 • 2017 साली झालेल्या स्पर्धेत सजनने कांस्यपदकाची कमाई केली होती.
 • सजन व्यतिरीक्त 55 किलो ग्रेको रोमन प्रकारात भारताच्या विजयनेही कांस्यपदकाची कमाई केली.

 • वरुण, अनुष्का ‘स्कील इंडिया’ या मोहिमेचे दूत
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘स्कील इंडिया‘ या मोहिमेचे दूत म्हणून अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची निवड करण्यात आली आहे.
 • याबाबतची माहिती ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’कडून (पीआयबी) देण्यात आली.
 • ‘सुई-धागा: मेड इन इंडिया‘ या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका आहे. देशातील प्रगतीवर आधारित हा पहिलाच चित्रपट आहे.
 • या चित्रपटात भारतातील कुशल आणि प्रभावशाली कारागीरांचे तसेच तळागाळातील कुशल कामगारांचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
 • तसेच याशिवाय या कारागीरांसमोरील प्रश्न आणि समस्या मांडण्यात आल्या आहेत. या समस्यांना हे कारागीर कशाप्रकारे सामोरे जातात, हे दाखविण्यात आले आहे.
 • या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर वरूण धवन आणि अनुष्का शर्मा हे दोघेही ‘स्कील इंडिया’साठी काम करणार आहेत. या योजनेंतर्गत देशातील विविध भागातील कुशल कारागीर यांच्यासाठी वेळ देणार आहेत.

प्रश्न मंजुषा:–

 • पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा ……. मध्ये सुरु झाली आहे.
 • ‘स्कील इंडिया‘ या मोहिमेचे दूत म्हणून अभिनेता …….आणि अभिनेत्री ………या दोघांची निवड करण्यात आली आहे.
 • …….आणि ………यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीरझाला आहे.
 • भारतरशियाकडून 450 कोटी डॉलर्स खर्चून ——-ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे.
 • 29 सप्टेंबर हा दिवस ‘—–’ दिवस
Please follow and like us:
0
Like
3

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi