16-20 March 2018 ||Current Affairs || चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ

चालू-घडामोडी
EXAM ORIENTED NOTES & MCQ

 • व्लादिमीर पुतिन यांची पुन्हा रशियाच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी निवड
 • जगातील शक्तिशाली नेते म्हणून ओळख
 • स्टॅलिन हे तीन दशक राष्ट्राध्यक्ष राहले
 • स्टॅलिन यांच्यानंतरचे ते सर्वाधिक काळ सत्ताधिश पदावरील नेते ठरले
 • पुतिन यांनी तब्बल 73.9 टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला.
 • आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार
 • पुतिन चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष
 • स्टॅलिन हे तब्बल 30 वर्षे रशियाच्या सर्वौच्च पदावर होते.
 • पुतीन हे 2000 मध्ये सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून निवडून आले.
 • दोन टर्म पूर्ण केल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले.
 • या काळात दिमित्री मेदवेदेव हे राष्ट्रध्यक्ष होते.
 • त्यानंतर पुन्हा पुतिन अध्यक्ष झाले

 • कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला
 • लिंगायत धर्मासंबंधी सरकारने नेमलेल्या न्या. नागमोहनदास समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य
 • प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार
 • सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लिंगायत समुदायाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा निर्णय
 • कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या 2(ड) आणि केंद्रीय अल्पसंख्याक कायदा 2(क) नुसार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार
 • राज्य सरकारने स्वतंत्र लिंगायत धर्मासंबंधी अहवाल मागविण्यासाठी निवृत्त न्यायाधीश नागमोहनदास यांच्या नेतृत्त्वाखाली 7 सदस्यग्नांची समिती स्थापन केली होती.
 • या समितीने 2 मार्च 2018 रोजी आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला.
 • अहवालात लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 • विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे हे देशातील उत्तम शासन असलेले शहर
 • स्पर्धेमध्ये २० राज्यांमधील २३ शहरांनी सहभाग घेतला
 • पुण्याने पहिला क्रमांक मिळवला
 • ‘इंडियाज सिटी सिस्टीम फॉर २०१७’ असे या सर्वेक्षणाचे नाव
 • पुण्याने १० पैकी ५.१ गुण मिळवले
 • दिल्लीला ४.४ , मुंबईला ४.२ गुण मिळाले
 • शहरातील एकूण शासकीय कामकाजाचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला होता.
 • एकूण ८९ प्रश्नांवरुन हे गुण देण्यात आले
 • त्यातही कायदे, धोरणे आणि माहिती अधिकार यांचा विचार कऱण्यात आला आहे.
 • आयटीहब म्हणून ओळख असलेले बंगळुरु यामध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले

 • चीननचे वेई फेंग यांना संरक्षणमंत्रिपद
 • वेई फेंग यांना चीनची संसद म्हणजेच नॅशनल पीपल्स काँग्रेसने संरक्षणमंत्रिपदासाठी निवडले.
 • भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्यात चीनचा दौरा करणार
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होऊ शकतात.
 • ही परिषद चीनच्या चिंगदाओ शहरात जूनमध्ये आयोजित होणार
 • जनरल झू किलियांग आणि झांग योकशिया यांची कमिशनच्या उपाध्यक्षपदी नेमणूक
 • चीनने स्वतःच्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करत 175 अब्ज डॉलर्सची भरभक्कम तरतूद केली

 • बीएनपी पेरीबस इंडियन वेल्स खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेंत
 • जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे —-अजिंक्यपद
 • पराभव —रशियाच्या डॅरिया कॅसेटकिनाचा
 • डब्ल्यूटीए टूरवरील ओसाकाचे हे पहिले विजेतेपद
 • इंडियन वेल्स स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविणारी ओसाका ही सर्वात कमी वयाची महिला टेनिसपटू

 • भारताचा ऑलिम्पिकपटू
 • वीरधवल खाडे ने सिंगापूर खुल्या आंतरराष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत सुवर्ण जिंकले
 • प्रकार —५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात
 • कोल्हापूरच्या २६ वर्षीय खाडेने हे अंतर २३.०२ सेकंदांत पार केले

 • फैज फैजलच्या नेतृत्वाखालील
 • विदर्भाने रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडक सामन्यातही विजय
 • विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर शेष भारताला पराभूत केले
 • 286 धावांची शानदार खेळी साकरणाऱया वासीम जाफरला सामनावीर ठरला

 • लोकसभा ग्रॅच्युइटी सुधारणा विधेयक मंजूर
 • पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी (सुधारणा) बिल 2017 चे उद्दिष्ट, प्रायव्हेट सेक्टर आणि सार्वजनिक क्षेत्रातील मधील कर्मचार्यांना
 • सध्याच्या 10 लाखांवरून 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटीची उच्च मर्यादा वाढविणे हे आहे.

 • नेव्ही चीफ अॅडमिरल सुनील लंबा हे अमेरिकेतील पाच दिवसांच्या दौर्यावर
 • दोन्ही राष्ट्राच्या सशस्त्र दलाच्या दरम्यान संबंध मजबूत करणे आणि संरक्षण सहकार्याचे नवीन मार्ग शोधणे हे आहे.
 • अॅडमिरल लांबा अमेरिकेच्या संरक्षण सचिव जेम्स मॅटीस, नेव्ही सचिव रिचर्ड स्पेन्सर यांच्या सह द्विपक्षीय चर्चा करतील

MCQ

 • व्लादिमीर पुतिन यांची पुन्हा रशियाच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी कितव्यांदा निवड झाली
 • लिंगायत धर्मासंबंधी नेमलेल्या ——समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य
 • विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले —- शहर हे देशातील उत्तम शासन असलेले शहर ठरले
 • विदर्भाने रणजी करंडका पाठोपाठ करंडक सामन्यात विजय

 

Please follow and like us:
0
Like
2
3 Comments

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi