14/15/16 JAN 2018 || Current Affairs || Exam Oriented Notes

चालू-घडामोडी

EXAM ORIENTED NOTES

—————————————————————————————————-

 • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारत भेटीवर
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केलं
 • नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या दौ-यावर आली
 • इस्रायलच्या पंतप्रधानांनी 14 वर्षांनंतर भारत दौरा केला आहे.
 • नेतान्याहू हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली
 • त्यांनी हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
 • त्यामुळे आता तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून तीन मूर्ती हायफा चौक ठेवण्यात येणार
 • यापूर्वी 2003 मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरोन भारताच्या दौ-यावर

 • भारत आणि इस्रायल यांच्यात 9 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये करार
 • या करारांमध्ये संरक्षण आणि दहशतवादविरोधी सहकार्य यांचा प्रामुख्याने समावेश
 • संरक्षण, सायबर सुरक्षा, गुप्त माहिती आदानप्रदान, कृषी, तंत्रज्ञान विकास, अत्याधुनिक रुग्णालय निर्मिती, तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन सहकार्य, चित्रपटांची सहनिर्मिती तसेच विमान वाहतूक आणि स्टार्टअप इत्यादी क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्याचे करार करण्यात आले.
 • दोन्ही देशांमधील व्यापार येत्या 5 वर्षात 50 हजार कोटी रुपयांवर नेण्यात येण्याचे ठरविण्यात आले.
 • इस्रालयी संरक्षण कंपन्यांनी भारतात यावे आणि भारतीय कंपन्यांबरोबर आधुनिक शस्त्रास्त्रांचे सहउत्पादन करावे, असा प्रस्ताव मोदींनी मांडला.
 • जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी करण्याच्या प्रस्ताव
 • अनेक अरब आणि मुस्लीम देशांनी विरोध केला आहे.
 • भारताने इस्रायलच्या विरोधात मतदान केले होते.
 • भारत दौरा सहा दिवसांचा असून ते उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रालाही भेट देणार

………………………………………………………………………………………………………….

 • जागतिक उत्पादन निर्देशांकात भारताला 30 वे स्थान मिळाले आहे.
 • चीन सर्व ब्रिक्स देशांच्या आघाडीवर
 • जपान पहिल्या तर चीन 5 व्या स्थानावर आहे.
 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केले.
 • जिनिव्हा येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रीडिनेस फॉर द फ्यूचर ऑफ प्रॉडक्शन अहवालात
 • रशियाला 35 , ब्राझीलला 41 वे आणि दक्षिण आफ्रिकेला 45 वे मानांकन
 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारत जगातील 5 वा मोठा उत्पादक देश
 • 2016 मध्ये भारताकडून 42,000 कोटी डॉलर्सची मूल्यवृद्धी
 • भारतात निर्मिती क्षेत्र मागील 3 दशकांपासून दरवर्षी सरासरी 7 टक्क्यांच्या दराने विकास गाठत आहे.
 • या क्षेत्राचे भारताच्या जीडीपीतील योगदान 16-20 टक्क्यांएवढे
 • भारताला या यादीत लीगसी श्रेणीत समाविष्ट
 • हंगेरी, मेक्सिको, फिलीपाईन्स, रशिया, थायलंड, आणि तुर्कस्तानचा समावेश
 • चीनला आघाडीच्या श्रेणीत सामील करण्यात आले.
 • ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका चौथी शेणीत नॅसेंटमध्ये सामील आहेत.
 • आघाडीच्या शेणीत –पाया बळकट असून भविष्याबद्दल अधिक जागरूक असणाऱया देशांचा
 • उच्चक्षमता–ज्यांची विद्यमान स्थिती मर्यादित, परंतु भविष्यासाठी अधिक क्षमता
 • लीगसी शेणीत– विद्यमान स्थिती बळकट परंतु भविष्यात जोखीम जाणवणाऱया देशांचा समावेश नॅसेंटमध्ये– वर्तमानात मर्यादित संधीं समवेत भविष्यासाठी देखील कमी क्षमता राखणाऱया

 • जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने
 • स्थळ- सिडनी
 • स्पर्धा—आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत
 • एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
 • या स्पर्धेतील हे पहिले अजिंक्यपद
 • केर्बरने ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचा पराभव केला.
 • डब्ल्यूटीए टूरवरील केर्बरचे हे 11 वे विजेतेपद आहे.

 • फाळणी, तसेच पाकिस्तान आणि चीनशी झालेल्या युद्धां नंतर त्या देशांच्या नागरिकांच्या भारतात मागे राहिलेल्या ९,४०० हून अधिक स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.
 • कायद्याच्या भाषेत अशा मालमत्तांना ‘शत्रू मालमत्ता’ (एनिमी प्रॉपर्टिज) असे संबोधले जाते.
 • या मालमत्तांचे मूळ मालक कधीकाळी भारतात वास्तव्य करीत होते
 • कालांतराने त्यांनी चीन व पाकिस्तानचे नागरिक्तव घेऊन तेथे स्थलांतर केलेले आहे.
 • फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी
 • भारत सरकारने ४९ वर्षांपूर्वी ‘शत्रू मालमत्ता’ कायदा केला
 • कायद्यात दुरुस्ती करून मूळ मालकांच्या वारसांचा या मालमत्तांवरील हक्क कायमचा संपुष्टात
 • या मालमत्ता विकून त्यातून पैसा उभा करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.
 • या स्थावर मालमत्तांची आजच्या भावानुसार किंमत एक लाख कोटी रुपयांच्या घरात.
 • १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर मूळ ‘शत्रू मालमत्ता’ कायदा’ केला गेला.
 • या कायद्यानुसार ‘कस्टोडियन आॅफ एनिमी प्रॉपर्टिज’ या विशेष प्राधिकाºयांची नेमणूक करून मालमत्ताचा ताबा व देखभालीचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले
 • ९२८० मालमत्ता पाकिस्तानी नागरिकांच्या
 • १२६ चिनी नागरिकांच्या आहेत.

 • केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.
 • हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
 • केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली.
 • सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली 2022 पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते.
 • हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे शैक्षणिक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येईल असे नकवी यांनी सांगितले.

प्रश्न मंजुषा

 • तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून —————-ठेवण्यात येणार
 • भारत आणि इस्रायल यांच्यात ——– महत्वाच्या क्षेत्रांमध्ये करार
 • जागतिक उत्पादन निर्देशांकात भारताला —वे स्थान
 • — देश पहिल्या तर चीन —– व्या स्थानावर आहे.
 • —-ने सिडनी आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
 • भारत सरकारने ४९ वर्षांपूर्वी ‘शत्रू मालमत्ता’ कायदा केला
 • कायद्यात दुरुस्ती कसली दुरुस्ती करण्यात आली

—————————————————————————————————

Please follow and like us:
0
Like
1

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi