08-15 September 2018 || Current Affairs || Chalughadamodi

08-15 September 2018 || Current Affairs || Chalughadamodi

current affairs


 • राज्यात मेगा टेक्‍सटाईल पार्कचा प्रस्ताव:–
 • शेतीपाठोपाठ राज्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला नवा आयाम देण्याचा राज्य शासनाचा निर्धार
 • त्यासाठीमालेगावसह सोलापूर, भिवंडी व खामगाव या चारही ठिकाणी मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव
 • वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुखयांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत शासनास प्रस्ताव सादर करावे, असे आदेश
 • सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून चार मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू झाल्यास रोजगारात वाढ होऊन पूरक व्यवसायांना व संबंधित शहरांच्या विकासाला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • राज्यातील इचलकरंजी व डोंबिवली येथे कापडावर प्रक्रिया करणारे टेक्‍सटाईल पार्क आहेत. यंत्रमाग व्यवसाय असलेल्या शहरांतच कापड निर्मिती व प्रक्रिया व्हावी, या हेतूने संबंधित शहरांत मेगा टेक्‍सटाईल पार्कचा प्रस्ताव आहे.
 • या चारही शहरांत सध्या जुन्या यंत्रमागावरच कामकाज चालत असल्याने ती यंत्रमाग अत्याधुनिकीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर आहेत.
 • या चारही शहरांमध्ये कपड्यावर प्रक्रिया (प्रोसेस युनिट) करणारे उद्योग सुरू झाल्यास कापड निर्मितीच्या खर्चातही बचत होईल.

 • सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाचे लोकार्पण

 

 • भारतीय डाक विभागातर्फे‘माय स्टॅम्प‘ या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आलेआहे.
 • यातिकिटाचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 • मुख्यमंत्री म्हणाले, सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात.
 • मी सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे.
 • सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहील.
 • हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल.
 • या वेळी टपाल विभाग व सिद्धिविनायक न्यास संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
 • या योजनेअंतर्गत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचे छायाचित्र सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 • न्या. रंजन गोगोई सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश:

 

 • सुप्रीम कोर्टचे न्या. रंजन गोगोई हे आता नवे सरन्यायाधीश (CJI) असणार आहेत.
 • राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.
 • 3 ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील.
 • सरन्यायाधीशदीपक मिश्रा हे 2 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत.
 • दीपक मिश्रा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रंजन गोगोई यांचे नाव केंद्र सरकारला पाठवले
 • ज्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
 • सर्वोच्च न्यायालयतील ज्येष्ठता क्रम लक्षात घेता न्या. मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोई हे दुसऱ्या स्थानी आहेत.
 • सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश पदाची जबाबदारी दिली जाते.
 • न्या. रंजन गोगोई हे 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते.
 • त्यानंतर फेब्रुवारी 2011 मध्ये ते पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते.
 • एप्रिल 2012 त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली.
 • आता त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी करण्यात आली आहे.

 • उत्साही देशांच्या यादीत भारताचा 117 वा क्रमांक

 

 • कोणता देश सर्वात जास्त उत्साही आणि कार्यक्षम आहे आणि कोणता देश सर्वात आळशी आहे
 • याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने 167 देशांमध्ये पाहणी करून वर्गवारी केली आहे.
  सर्वात जास्त कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा देशाने पहिले स्थान पटकावले आहे
 • तर यादीत तळाला म्हणजे सर्वात आळशी या स्थानावर कुवेत देश आहे.
  उत्साहीपणाच्या निकषामध्ये 167 देशांमध्ये भारत 117 व्या स्थानावर आहे.
 • उत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका 143व्या स्थानावर,
 • इंग्लंड 123व्यास्थानावर, सिंगापूर 126व्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया 97व्या स्थानावर आहे.
 • तसेच कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया आणि इराकमधील निम्म्याहून जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
 • तर युगांडामधील केवळ 5.5 टक्के जनता पुरेशी कार्यप्रवण नाही आहे.

 • भारत आणि चीनला बुलेट ट्रेनने जोडले जाणार:

 

 • चीनमधील कुनमिंग व कोलकाता ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा आमचा विचार आहे अशी माहिती कोलकातामध्ये चीनचे महावाणिज्य दूतमा झान्वू यांनीदिली.
 • कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना मा झान्वू यांनी ही माहिती दिली.
 • दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी कोलकाता आणि कुनमिंग शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो, असे झान्वू म्हणाले.
 • जर हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरला तर कुनमिंग व कोलकाता शहरांमधील अंतर अवघ्या काही तासांवर येईल असेही ते पुढे म्हणाले.
 • या रेल्वेमार्गाचा म्यानमार आणि बांगलादेशलाही फायदा होईल, कारण हा मार्ग म्यानमार व बांगलादेशमधून जाईल या 2800 कि.मी.च्या मार्गावर औद्योगिक प्रकल्पांचे जाळेही विणले जाऊ शकते.
 • त्याचा प्रकल्पात सहभागी सर्वच देशांना फायदा होईल. यापूर्वी 2015 मध्ये ग्रेटर मेकांग सब्रेगियन (जीएमएस) च्या कुनमिंगमध्ये झालेल्या बैठकीतही या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला होता, असेही झान्वू म्हणाले.
 • भारताने बेल्ट अँड रोड या चीनच्या प्रकल्पाला विरोध केला असला, तरी हा प्रकल्प चीनने जगजिंकण्यासाठी किंवा शेजारी देशांवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार केलेला नाही, असा खुलासा झांवू यांनी केला.
 • ते म्हणाले, की भारत ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे.
 • शेजारी देशांशी आम्हाला स्थिर संबंध हवे आहेत. भारत व रशिया हे दोन मोठे देश आहेत व ते चीनचे शेजारी आहेत.
 • त्यांच्याशी आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत.

 • पोलंडमधील स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोमला सुवर्णपदक

 

 • भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने, पोलंड येथील ग्लिविसेत सुरु असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 • 48 किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 ने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
 • राष्ट्रकुल स्पर्धेनंतर झालेल्या दुखापतीमुळे मेरी कोमने आशियाई स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र यानंतर पोलंडमधील स्पर्धेमधून पुनरागमन करत मेरी कोमने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.
 • भारताच्या मनिषानेही 54 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
 • संपूर्ण सामन्यात मेरी कोमच्या खेळापुढे तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभावच लागू शकला नाही. मेरीने उजव्या हाताने केलेले प्रहार तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चांगलेच वर्मावर बसले.
 • याचसोबत ज्यावेळी कझाकिस्तानच्या खेळाडूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मेरीने तिचे प्रयत्न हाणून पाडले.
 • मात्र दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने भारताच्या मनिषावर 3-2 ने मात केली.
 • अटीतटीच्या झालेल्या सामन्या इव्हानाच्या आक्रमक खेळापुढे मनिषाचा निभाव लागू शकला नाही. यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

 • ISRO कडून दोन विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

 

 • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 16 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही सी 42च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन झेपावले.
 • श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी अंतराळात झेपावले.
 • हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले.
 • या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नव्हता.
 • या उपग्रहांचे एकत्रित वजन 889 कि.ग्रॅम आहे.
 • या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे.
 • वनांचे मॅपिंग, पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे तसेच इतरही काही कामांसाठी यांचा उपयोग होईल.
 • ‘सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज’ लिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत.

प्रश्न मंजुषा   >>>>>>

 


 • पोलंडमधील स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोमला —— वजनी गटात सुवर्ण पदक
 • चीनमधील कुनमिंग व ———- ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा आमचा विचार आहे अशी माहिती कोलकातामध्ये चीनचे महावाणिज्य दूतमा झान्वू यांनीदिली
 • उत्साही देशांच्या यादीत भारताचा ….. वा क्रमांक
 • मालेगावसह सोलापूर, भिवंडी व खामगाव या चारही ठिकाणी मेगा …… पार्क सुरू होणार
 • ….. यांची सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाली आहहे

 

Please follow and like us:
0
Like
2

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi