08 -14 August 2018 || Current Affairs Marathi

0814 August 2018 || Current Affairs

वसंतराव नाईक कृषी पुरस्कार

 • वसंतराव नाईक कृषी पुरस्कार महाराष्ट्रातील सात प्रयोगशील शेतकरी आणि दोन कृषितज्ज्ञांना जाहीर करण्यात आले आहेत.
 • या पुरस्कारांचे वितरण माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 39 व्या स्मृतिदिनी येत्या 18 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
 • विदर्भातील तीन शेतकऱ्यांसह माजी आमदार विठ्ठल गणपत घारे (रा. काळुस्ते, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांना भात शेतीसाठी,
 • ब्रह्मदेव नवनाथ सरडे (रा. सोगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांना निर्यातक्षम डाळिंबासाठी आणि
 • किरण नवनाथ डोके (रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना केळीचे विक्रमी उत्पादन आणि निर्यातीसाठी हे पुरस्कार जाहीर झालेत.
 • कापसावरील “गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण’ या विषयावरील पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कृषिशास्त्रज्ञ डॉ. विलास भाले व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे डॉ. व्ही. चेन्नाबाबू नाईक या दोन शास्त्रज्ञांनाही जाहीर

स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील ३६ स्थानके

 • ‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’
 • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला
 • ‘अ-१’श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते सातव्या क्रमांकावर
 • मुंबई-सीएसएमटी आणि दादर स्थानकांनी  स्थानक अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या क्रमांकावर
 • अहवालात देशातील ४०७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-१’ श्रेणीमधील ७५ रेल्वे स्थानकांत राज्यातील १० रेल्वे स्थानकांचा समावेश
 • ५० कोटींपेक्षा जास्त प्रवासी ज्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात अशी रेल्वे स्थानके ‘अ-१’ श्रेणीत आहेत.
 • ‘अ’ श्रेणीमध्ये ३३२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
 • ‘अ-१’ या श्रेणीत पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांनाही स्थान मिळाले आहे.

मद्रासच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विजया कापसे ताहिलरामानी यांची नियुक्ती

 • न्या. विजया कापसे ताहिलरामानी
 • नेमणूक — मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  केली
 • शपथ ग्रहण :–12 ऑगस्ट रोजी तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून
 • मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती —न्या. नरेश हरिश्चंद्र पाटीलयांची नियुक्ती करण्यात आली
 • मागच्या  वर्षी डिंसेबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर सेवानिवृत्त झाल्या नंतर न्या. विजया कापसे ताहिलरमानी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. विजया ताहिलरमानी यांची शिफारस मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी केली होती.

मिहानमध्ये होणार संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प

 • नागपूर येथील मिहानमध्ये  संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी 20 एकर जागा देण्याचा निर्णय —मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 • संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे 50 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
 • विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर 10 मधील सुमारे 20 एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
 • सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या ठिकाणी विविध संरक्षण साहित्य निर्मिती केली जाणार आहे.
 • त्याचप्रमाणे शिर्डी विमानतळ येथे नाइट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

देशातील Top 10 राहण्यासाठी ची शहरे

 • केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाने १४ अगस्त रोजी हि यादी प्रसिद्ध केली 
 • यात पुणे शहराने बाजी मारत प्रथम क्रमान पटकावला आहे 
 • 1.पुणे
 • 2.नवी मुंबई
 • 3.बृहन्मुंबई
 • 4.तिरुपती
 • 5.चंडीगड
 • 6.ठाणे
 • 7.रायपुर
 • 8.इंदूर
 • 9.विजयवाडा
 • 10.भोपाल
 • दिल्ली ६५ व्या क्रमांकावर आहे 
 • निवड निकष —प्रशासन ,सामाजिक संस्था ,आर्थिक  व भौतिक पायाभूत सुविधा.

माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे  निधन

 • माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज दि .१३/०८/२०१८ रोजी  निधन झाले वयाच्या 89व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
 • सोमनाथ चॅटर्जी यांनी सीपीएम पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
 • सन 1968 ते 2008 पर्यंत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता ते नेता म्हणून सक्रियपणे कामकाज पाहिले.
 • तर 1971 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनून संसदेत पोहोचले.
 • तब्बल 10 वेळा ते खासदार राहिले आहेत.
 • दरम्यान, सन 2008 साली भारत-अमेरिका परमाणू करार विधेयकावेळी सीपीएमने तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारचे समर्थन काढून घेतले होते.
 • त्यावेळी, सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे सभापती होते.
 • यावेळी पक्षाने त्यांना सभापतीपद सोडण्याची सूचना केली होती.
 • मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे सीपीएमने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून काढून टाकण्यात आले होते

 

पावसाळी अधिवेशनात सर्वाधिक काम

 • संसदेत 20 विधेयकं मांडली गेली, त्यातून 18 पास झाली.
 • लोकसभेत नियोजित कामकाजापेक्षा 10 टक्के जास्त काम झाले तर राज्यसभेत 66 टक्के जास्त काम झाले.
 • राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा बहाल करण्यात आला.
 • लोकसभेत 50 टक्के तर राज्यसभेत 48 टक्के वेळ कायदे निर्मिती झाली.
 • आर्थिक अधवेशनाच्या तुलनेत तिप्पट काम झाले.
 • 26 टक्के विधेयके संसदीय समितीकडे पाठवली गेली.
 • 999 पर्सनल बिल संसदेत सादर करण्यात आले.

देशातील पहिले स्वॅट महिला कमांडो पथक

 • पुरुषांच्या बरोबरीने आता महिला कमांडो दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी संभाळणारआहेत.
 • दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तयार करण्यात आले आहे.
 • स्वॅट महिला कमांडो पथक असलेले दिल्ली हे देशातील पहिले पोलीस दल ठरणार आहे.
 • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहयांच्या उपस्थितीत स्वॅट महिला कमांडोंचा दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेशकरण्यात येईल.
 • ईशान्य भारतातील 36 महिलांचा या कमांडो युनिटमध्ये समावेशकरण्यात आला आहे.
 • अनेक प्रगत पाश्चिमात्य देशांनी अजून महिलांचे स्वॅट कमांडो पथक उभारलेले नाही.
 • या 36 महिला कमांडोंमध्ये
 • आसाममधील 13, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूरमधल्या प्रत्येकी पाच महिलांचा समावेश

वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धा भारतात  होणार

 • भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा  चौथ्यांदा होणार आहे 
 • स्थळ :- नवी दिल्लीत होणार आहे.
 • कधी :-2019
 • कितवी :–भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा
 • 2020 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचेही यजमानपद —भारतास देण्यात आले आहे
 • यापूर्वी—2017 च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये तसेच ऑक्‍टोबरमध्ये विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा दिल्लीत झाली आहे
 • आशियाई शॉटगन (नोव्हेंबर-डिसेंबर 2012), 
 • आशिया एअरगन(सप्टेंबर-ऑक्‍टोबर 2015) 
 • आणि आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा(जानेवारी-फेब्रुवारी 2016) या स्पर्धाही भारतात झाल्या आहेत.

नासाचे सोलर पार्क प्रोब यान आकाशात झेपावले 

 • रविवारी दि 12/08/2018 दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले
 • सूर्यामध्ये होणाऱया गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास हे यान करणार आहे.
 • नासाचे आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केलेले यानही एका कारच्या आकाराएवढे असून
 • ते सूर्याच्या पृ÷भागापासून 40 लाख मैल दुरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे.

Current Affairs mcq

 • डॉ. विलास भाले यांना कोणत्या पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे ?
 • ‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ —‘अ-१’श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते —— क्रमांकावर
 • मद्रासच्या मुख्य न्यायमूर्तीपदी ——–यांची नियुक्ती करण्यात आली
 • मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती ——- यांची नियुक्ती करण्यात आली
 • देशातील Top 10 राहण्यासाठी ची शहरे मध्ये पुणे कोणत्या क्रमांकावर आहे ?
Please follow and like us:
0
Like
4

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi