चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||10-12 March 2018 ||Current Affairs

1012 March 2018 ||Current Affairs

 • शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱया देशांच्या यादीत भारत पहिला 
 • 2013 ते 2017 या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱया देशांच्या यादीत भारत पहिला
 • एकूण आयातीपैकी 12 टक्के आयात भारतने केली
 • संस्था —इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूट (आयपीआरआय)
 • शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • सौदी अरेबिया दुसऱया स्थानी
 • इजिप्त,
 • संयुक्त अरब अमिरात,
 • चीन,
 • ऑस्ट्रेलिया,
 • अल्जेरिया,
 • पाकिस्तान

 • चीनच्या संसदेने रविवारी राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची निर्धारित मर्यादा समाप्त केली
 • विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आता आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतात.
 • संसदेने दोन कार्यकाळाची अनिवार्यता दोन तृतीयांश बहुमताने संपुष्टात आणली.
 • चीनमध्ये एका व्यक्तीला जास्तीत-जास्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होता येणारा कायदा होता
 • संसदेने नवीन कायदा मंजूर करून ही अट रद्द केली

 • भारत दौऱयावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युयल मॅक्रॉन
 • दोन्ही देशांमध्ये एकूण 14 करारांवर स्वाक्षऱया
 • भारत-फ्रान्स मधील 14 करार
 • शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा व बदल
 • पर्यावरण समृद्धीसाठी प्रयत्न करणे
 • गुप्त माहिती तिसऱया पक्षाला न देणे
 • मेरिटाइम जागृती मोहीम राबविणे
 • अण्वस्त्र शक्तीसाठी सहकार्य
 • संरक्षण दलाला तार्किक आधार पुरविणे
 • नौका परिवहनासाठी मदतीचा हात
 • स्मार्ट सिटी प्रकल्पात सहकार्य
 • सौर ऊर्जा वापरावर अधिक भर
 • अंमली पदार्थ तस्करी व त्यावर निर्बंध
 • मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप
 • रेल्वेमध्ये तांत्रिक सहकार्य करणे
 • इंडो-फ्रान्स रेल्वे फोरमची स्थापना
 • नागरी विकासासाठी प्रयत्नशील राहणे

 • चहा निर्यातीमध्ये 7 टक्क्यांनी वाढ
 • एप्रिल ते जानेवारी कालावधीमध्ये
 • निर्यात –200.67 दशलक्ष किग्रॅवर
 • मागच्या वर्षी ही निर्यात 188.10 दशलक्ष किग्रॅ.
 • टी बोर्ड इंडियाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षातील 10 महिन्यातील निर्यात 3,970.37 कोटी रुपयांची होती.
 • गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 2.5 टक्क्यांनी वाढ होत मागील वर्षी ती 3,874.82 कोटी रुपये होती.
 • पाकिस्तान, चीन, इराण आणि इजिप्तमधील निर्यातीमध्ये वाढ,

रशिया, युक्रेन, कझाकस्तान, जर्मनीची निर्यात घटली.


 • भारताची नेमबाज –अंजुम मोदगिलने
 • स्पर्धा –मेक्सिकोत सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक
 • पदक —रौप्यपदक
 • महिलांच्या 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन्स इव्हेंट
 • चायनीज माजी कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियन रुईजिआओ पेईने —सुवर्ण
 • तिंग सून हिने —-कांस्यपदक

 • मेक्सिकोतील ग्वाडालाजारा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या
 • खेळाडू —युवा अखिल शेरान
 • पदक —सुवर्ण
 • प्रकार — पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन
 • विश्वचषक स्पर्धेत पदार्पणातच पदक जिंकणारा तो भारताचा चौथा नेमबाज बनला आहे.
 • अखिलने अंतिम फेरीत 455.6 गुण नोंदवत
 • ऑस्ट्रियाच्या बर्नहार्ड पिकलला (452) दुसरे स्थान

 • मेक्सिकोत झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा नवा इतिहास
 • भारताने पहिले स्थान मिळविताना एकूण 9 पदक जिंकले
 • या स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी
 • भारताने 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्य अशी एकूण 9 पदक
 • भारताच्या शहाझेर रिझवी, मनु भाकर, अखिल शेरॉन आणि ओमप्रकाश मिथरवाल यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदके,
 • अंजुम मुदगीलने रौप्य
 • तसेच जितु राय आणि रविकुमार यांनी कास्य पदक

 • 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास
 • आरोपीला फाशीची शिक्षा देणारा कायदा राजस्थान सरकारने केला
 • शिक्षेची तरतूद करणारे राजस्थान हे मध्यप्रदेशनंतरचे दुसरे राज्य ठरले
 • राज्याच्या विधानसभेत ही तरतूद असणारे विधेयक शुक्रवारी संमत करण्यात आले.
 • हरियाणा सरकारनेही असाच कायदा करण्यासाठी पावले उचलली आहेत.
 • कायद्याचे प्रारूप तयार करण्यात आले असून अद्याप त्याला विधानसभेची संमती मिळावयाची आहे.

 • —– ते —–या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱया देशांच्या यादीत भारत पहिला
 • चीनच्या संसदेने रविवारी राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा —– कार्यकाळांची निर्धारित मर्यादा समाप्त केली
 • 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देणारा कायदा सर्व प्रथम कोणत्या राज्याने केला
 • मेक्सिकोत झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनि एकून किती सुवर्ण पदक मिळविले

 

Please follow and like us:
0
Like
6

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi