चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES ||26 ते 28 Feb 2018 || Current Affairs

चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES ||26 ते 28 Feb 2018 || Current Affairs

 

current affairs

 

 • भारतीय नौदल पोर्टब्लेअर येथे ‘मिलन सरावा’चे आयोजन 6 ते 13 मार्चपर्यंत करणार आहे.
 • भारतासमवेत 17 देशांच्या नौदलांचा सहभाग असणार
 • मालदीव मध्ये 5 फेब्रुवारी पासून आणीबाणी लागू आहे.
 • 16 देशांनी सरावात भाग घेण्यास सहमती दर्शविली आहे.
 • नौदलप्रमुख — सुनील लांबा.
 • 1995 मध्ये सुरू झालेल्या मिलन सरावाचा उद्देश पूर्व आशिया आणि दक्षिणपूर्व आशियाच्या नौदलांमध्ये मैत्रिपूर्ण संबंधांना चालना देणे आहे.

 • आपल्या अभिनय आणि नृत्याविष्काराने रसिकांवर मोहिनी घालणाऱया हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन
 • त्या 54 वर्षांच्या होत्या.
 • श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटसफष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तामिळी, तेलगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय
 • वयाच्या चौथ्या वर्षी ‘थुनैवन’ या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात
 • ‘ज्युली’ या बॉलीवूडपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण
 • ‘सोलवा सावन’ हा श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट
 • ‘चालबाज’ आणि ‘लम्हे’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
 • भारत सरकारने 2013 मध्ये श्रीदेवी यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.

 • कर्नाटकने सौराष्ट्राला अंतिम लढतीत 41 धावांनी नमवत विजय हजारे चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकले
 • कर्नाटकाला या जेतेपदाच्या सामन्यात 45.5 षटकात सर्वबाद 253 धावा
 • सौराष्ट्राचा डाव 212 धावांमध्येच संपला
 • मयंक अगरवालने 79 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारासह आपली खेळी सजवली.

 • भारतीय बॉक्सर विकास कृष्णन 69 व्या स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
 • स्पर्धेतील सर्वोत्तम मुष्टियोद्धा
 • पहिला भारतीय मुष्टियोद्धा ठरला
 • भारताने या स्पर्धेत एकूण 11 पदकांची कमाई केली, त्यात 2 सुवर्ण, 3 रौप्य व 6 कांस्यपदकांचा समावेश आहे.
 • महिलांनी 6 तर पुरुषांनी 5 पदके मिळविली.
 • 49 किलो वजन गटात अमित पांघल — सुवर्णपदक
 • मोरोक्कोच्या सईद मोर्दाजीचा पराभव
 • सलग दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण
 • महिलांमध्ये एमसी मेरी कोमला ==== रौप्यपदकावर
 • 48 किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत बल्गेरियाच्या सेवदा असेनोव्हा कडून —पराभव
 • आशियाई चॅम्पियनशिप व इंडिया ओपन बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदके
 • 81 किलोवरील गटात सीमा पुनिया — रौप्यपदक
 • रशियाच्या ऍना इव्हानोव्हाच —पराभव

 • पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांसाठी निळय़ा रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने लागू केले आहे.
 • युआयडीआयने ही घोषणा आपल्या ट्विटर वरून केली
 • निळय़ा रंगाचे बाल आधारकार्ड काढण्यासाठी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा आधारक्रमांक आणि जन्म दाखल्याची आवश्यकता लागणार आहे.
 • मुलांसाठीचे हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक तपशिलाची आवश्यकता असेल.
 • इतर सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी हे निळे बाळ आधारकार्ड महत्त्वपूर्ण असेल.
 • जेव्हा मुल वयाची पाच वर्ष पूर्ण करेल, तेव्हा त्याचे बायोमेट्रीक तपशील अपडेट करावे लागतील.

प्रश्न मंजुषा

 • भारतीय नौदल पोर्टब्लेअर येथे ‘मिलन सरावा’चे आयोजन — ते – मार्च पर्यंत करणार
 • श्रीदेवी यांचे दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले त्यांना भारत सरकारने कोणता पुरस्कार देवून गौरण्यात आले होते
 • विजय हजारे चषक स्पर्धेचे जेतेपद कोणत्या राज्यने जिंकले जिंकले
 • भारतीय बॉक्सर ——–69 व्या स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
 • किती वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांसाठी निळय़ा रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने लागू केले

 

Please follow and like us:
0
Like
9

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi